उद्योगमंत्र्यांना आयमाचे साकडे

उद्योगमंत्र्यांना आयमाचे साकडे

सातपूर । प्रतिनिधी Satpur

उद्योग क्षेत्राचे ( Industrial Sector ) अनेक प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याने उद्योगमंत्र्यांनी या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी आयमाच्यावतीने ( AIMA )उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Industry Minister Subhash Desai )यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनामध्ये अनेक प्रश्न मांडण्यात आले. त्यात प्रामुख्याने अंबडच्या प्लेटिंग उद्योगांचा प्रलंबित असणारा सीईटीपी प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, उद्योगनगरीच्या स्थापनेपासून अस्तित्वात असलेली भूमिगत गटार योजना उभारावी, विविध संघटनांच्या माध्यमातून कामगार व उद्योगांमध्ये सुरू असलेली दहशत थांबवावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन आयमाच्या वतीने देण्यात आले.

यावेळी उद्योजकांशी संवाद साधताना उद्योगमंत्र्यांनी औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न तातडीने सोडवण्याची लक्ष घालणार असून नाशिकवर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष निखिल पांचाळ, माजीअध्यक्ष धनंजय बेळे, राजेंद्र अहिरे, सेक्रेटरी ललित बूब उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com