आयमाची १०० कॉन्सन्ट्रेटरची ऑक्सिजन बँक पुढील आठवड्यात सुरू होणार

आयमाची १०० कॉन्सन्ट्रेटरची ऑक्सिजन बँक पुढील आठवड्यात सुरू होणार

नाशिक | प्रतिनिधी

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन अर्थात आयमाकडून जिल्ह्यातील उद्योजकांसाठी अंबड सातपूर व सिन्नर येथे करोना तपासणी व लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते या पाठोपाठ आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक उभारली जात आहे. पुढील आठवड्यात ही बँक उद्योजक, कामगार यांसह सर्वसामान्य नाशिककरांसाठी कार्यरत होणार असल्याचे अध्यक्ष वरुण तलवार यांनी सांगितले...

करोनाची दुसरी लाट आल्यानंतर निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवडा तसेच होम क्वारंटाईन रुग्णांना जाणवलेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा तुटवडा या सगळ्या बाबी लक्षात घेत एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी आणि महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आयमा रिक्रिएशन सेंटर येथे उद्योजकांना आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत आयमा च्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा बँकेची उभारणी करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील आठवड्यात प्रत्यक्षात कामकाज सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे अध्यक्ष वरूण तलवार यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने उद्योजकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजकांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून १०० कॉन्सन्ट्रेटर खरेदीची तयारी सुरू केली असून, नाशिककरांना अत्यल्प अनामत रकम ठेवून आयमा रिक्रिएशन सेंटर येथून विनाशुल्क ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुढील आठवड्यापासून ही बँक कार्यरत होण्यासाठी सर्व प्रयत्न करीत असल्याचे निखिल पांचाल यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com