Video : अचानक लष्करी जवानाच्या हळदीला कृषिमंत्री पोहोचले अन्....

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

भारतीय सैन्य दलात पंजाब राज्यात कार्यरत असलेल्या मालेगाव तालुक्यातील शेंदुर्णी गावातील लष्करी जवान भूषण उत्तम पिंजण यांच्या विवाह सोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमास राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी हजेरी लावली.

जवान भूषण यास हळद लावून त्याची इच्छापूर्ती करत नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लष्करी जवान भूषण यांना हळद लावताना कृषिमंत्री भुसे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर धूम करत असून नेट करांच्या कौतुकाचा विषय बनला आहे.

जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यात नव्हे राज्यात लोकप्रियता संपादन केली आहे.

बांधावर जाऊन शेतकऱ्यांची हितगूज करत त्यांच्या समस्या जाणून घेणे आपल्या विभागामार्फत त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करणे असे काम ते करत आहेत.

शेतात भेट देणारे मंत्री भुसे शेतकऱ्यांबरोबरच त्याने आणलेला भाकरी कांद्याचा आस्वाद घेतात. मंत्रीपदाचा कुठलाही बडेजाव मिरवायचा नाही याची काळजी भुसे सातत्याने घेत असतात. शेंदुर्णी येथील लष्करी जवान भूषण पिंजन यांच्या निमंत्रणावरून मंत्री भुसे यांनी विवाह सोहळ्यास हजेरी लावली. भूषण यांचा हळदीचा समारंभ सुरु होता. जवळचा नातेवाईका प्रमाणेच भुसे यांनी देखील भूषण ला हळद लावून नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.