राज्याचे कृषिमंत्री जेव्हा करोनाबाधित रुग्णांसोबत योगासने करतात
नाशिक

राज्याचे कृषिमंत्री जेव्हा करोनाबाधित रुग्णांसोबत योगासने करतात

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मालेगाव | प्रतिनिधी

शहरातील मसगा महाविद्यालयातील करोना उपचार केंद्रात दाखल बाधित रुग्णांचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच करोनाशी प्रतिकार करताना मानसिक बळ मिळावे यास्तव आज राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी स्वतः बाधित रुग्णां बरोबर संगीताच्या तालावर योगासने केली.

बाधित रुग्णांचा तिरस्कार न करता त्यांच्याशी सौजन्याने वागत या लढाईत त्यांचे मनोबल कसे वाढेल असेच प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजे असे आवाहन ना. भुसे यांनी यावेळी बोलताना केले.

कृषी मंत्री दादाजी भुसे स्वतः आपल्याबरोबर योगासने करत नृत्य करताना पाहून बाधित रुग्णांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते.

करोनावर मात करत तुम्ही सर्वजण लवकरच घरी परताल अशा शुभेच्छा भुसे यांनी बाधित रुग्णांना यावेळी दिल्या.

यावेळी उपमहापौर निलेश आहेर, ज्येष्ठ नेते मनोहर बापू बच्छाव, राजेश अलिझाड, डाँ. जतीन कापडणीस, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com