ना. भुसेंकडून भाजीविक्रेत्याची विचारपूस

ना. भुसेंकडून भाजीविक्रेत्याची विचारपूस

कोकणगाव। वार्ताहर Kokangaon

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे मालेगावकडून नाशिकला जात होते.

कोकणगाव येथे महामार्गावर शेतकरी ताजा भाजीपाला विकतांना दिसताच गाडी थांबवून शेतकर्‍याची व्यथा जाणून घेत त्यांनी भाजीपाला बाजारभावाची चौकशी केली.

शुक्रवार दि.4 रोजी कृषीमंत्री दादा भुसे हे नाशिक येथे जात असतांना त्यांनी कोकणगाव येथील स्थानिक शेतकरी बंधू तथा वारकरी सांप्रदायिक लक्ष्मण मोरे हे महामार्ग शेजारी छत्रीच्या सानिध्यात शेतकरी ते ग्राहक या पद्धतीचा थेट अवलंब करुन ताजा भाजीपाला विक्री करतांना पाहिले.

यावेळी ना. भुसे हे काही काळ थांबून त्यांची भेट घेतली व त्यांच्याशी मोकळीक संवाद साधला. यावेळी शेतमालाची करोनाच्या महामारीत झालेली परवड व पिकलेला शेतीमाल विकण्यासाठी होणारे हाल, मिळणारा बाजारभाव याविषयी सविस्तर चर्चा केली.

यावेळी शेतकर्‍यांच्या या उपक्रमाची त्यांनी प्रशंसाही केली. लक्ष्मण मोरे हे त्यांच्या शेतातील स्वतः उत्पादित केलेला ताजा भाजीपाला ग्राहकांसाठी दैनंदिन उपलब्ध करुन देतात. यामुळे करोना पार्श्वभूमीवर ताजा भाजीपाला मिळत असल्याने स्थानिकांना याचा निश्चितच फायदा होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com