कृषी विभागाच्या 'विकेल ते पिकेल'साठी कळवण तालुक्यातील पाच गावांचा समावेश

कृषी विभागाच्या 'विकेल ते पिकेल'साठी कळवण तालुक्यातील पाच गावांचा समावेश

कळवण | प्रतिनिधी

कळवण कृषि विभागाच्या विकेल ते पिकेल संकल्पनेवर आधारीत कळवण तालुक्यामध्ये मौजे खेडगाव, नवी बेज, जुनी बेज, दह्याणे (ओ) व भेंडी या पाच गावांची कांदा प्रकल्पासाठी सन २०२० - २१ मध्ये निवड करण्यात आली आहे.

प्रकल्पातील गावांमध्ये कांदा काढणीची कामे सध्या मोठ्या प्रमाणात चालु आहेत. प्रकल्प कालावधीमध्ये या पाच गावांमध्ये पुनदग्रीन व्हँली फार्मर प्रोड्युसर कंपनी रवळजी व सप्तश्रृंगी फार्मर प्रोड्युसर कंपनी वणी या दोन शेतकरी उत्पादक कंपनीसोबत शेतकरी व गटांची कांदा खरेदीसाठी करार करण्यात आलेले आहेत.

मौजे खेडगाव व परिसरातील पुनदग्रीन व्हँली फार्मर प्रोड्युसर कंपनीने शेतात जाऊन कांदा खरेदी करुन कंपनीच्या माध्यमातुन आजपर्यंत ७५ टन कांदा कोलंबो (श्रीलंका) येथे निर्यात केलेला आहे.

त्याचप्रमाणे कंटेनर उपलब्ध होताच पुढील कांदा निर्यात करण्याचे नियोजन असल्याचे कंपनीचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.

पुनदग्रीन व्हँली फार्मर प्रोड्युसर कंपनीला मार्गदर्शनासाठी आत्मा नाशिकचे प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, उपविभागीय कृषि अधिकारी कळवण. डॉ. कैलास खैरनार,तालुका कृषि अधिकारी कळवण विजय पाटील, मंडळ कृषि अधिकारी पाखरे, कृषि पर्यवेक्षक आहेर तसेच कृषि सहाय्यक ए.बी. भगत यांनी प्रत्यक्ष कंपनी प्रक्षेत्रावर कांदा साठवणुक व प्रतवारी गृहास भेट दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com