पीएम किसान योजनेच्या प्रचार रथाला कृषी विभागाचा हिरवा झेंडा

पीएम किसान योजनेच्या प्रचार रथाला कृषी विभागाचा हिरवा झेंडा

नाशिक । Nashik

जिल्ह्यामध्ये पंतप्रधान पिक विमा योजना (Pradhan Mantri Pik Bima Yojana) ही शासनाने निवडलेल्या एचडीएफसी आरगो या कंपनीमार्फत ( HDFC Argo company) राबविण्यात येत असून या योजनेच्या प्रचार व जनजागृती रथाचा शुभारंभ नाशिक येथे जिल्हा अधीक्षक कार्यालयात (District Superintendent Office) मोठ्या उत्साहात संपन्न झाला...

उपविभागीय कृषी अधिकारी (Sub Divisional Agriculture Officer) गोकुळ वाघ (Gokul Wagh) यांनी या प्रचार रथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी वाघ म्हणाले की, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान होणे तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster) काढणी पश्चात नुकसान, पीक पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणारी घट या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांना जे नुकसान सोसावे लागते ते नुकसान सोसावे लागू नये म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी (Farmers) प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा असे आव्हान त्यांनी केले.

दरम्यान, याप्रसंगी नाशिक तालुका कृषी अधिकारी वाघ, मंडळ कृषी अधिकारी कुलकर्णी, कृषी पर्यवेक्षक भास्कर राहणे, एचडीएफसी आरोग्याचे नाशिक जिल्हा मॅनेजर राजेश गायकवाड,रुपेश दीक्षित, दादासाहेब पवार, तालुका प्रतिनिधी बाळासाहेब रायकर,अमोल जाधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com