राज्यपालांच्या हस्ते होणार कृषी पुरस्कारांचे वितरण

राज्यपालांच्या हस्ते होणार कृषी पुरस्कारांचे वितरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील कृषी पुरस्कार ( Krushi Puraskar )वितरण सोहळा यंदा 1 व 2 मे रोजी नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठात (University of Health Sciences )होणार आहे.

यात राज्यातील 198 शेतकर्‍यांना राज्यपालांच्या ( Governor ) हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी राज्यपालांची उपस्थिती निश्चित झाली असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीसाठी दोन दिवसात माहिती मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यातील प्रयोगशील, प्रगतशील युवा शेतकर्‍यांना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मात्र, करोनामुळे हा पुरस्कार वितरण सोहळा रखडला होता. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत न घेता नाशिकला घेतला जाणार आहे. सोहळ्यासाठी मुबलक जागा पुरस्कारार्थी शेतकर्‍यांची राहण्याची व्यवस्था, येण्याजाण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्थेसाठी कृषी विभाग नियोजन करत आहे.

नाशिकमधील दिंडोरी रोडवरील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात हा सोहळा होणार आहे. यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकारी व राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.