नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :जीएसटी च्या विविध तक्रारी विषयी उत्तर महाराष्ट्र करसल्लागार असोसिएशनच्या वतीने आंदोलन करुन जीएसटी कार्यालयाच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले..यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे की ,जीएसटी भारतात येऊन साधारण साडेतीन वर्ष झाले. पण या साडेतीन वर्षात जवळपास दर आठवड्याला बदल होत असतात. त्याचा प्रचंड त्रास हा व्यापाऱ्यांना व कर सल्लागारांना मोठ्या प्रमाणात होत असतो. येणाऱ्या नवीन जाचक तरतुदींची फॉर्ममध्ये ऐनवेळी होणारे बदल, कायद्यांमध्ये किचकट होणारे बदल यामुळे प्रचंड मानसिक त्रास हा सर्वांनाच सहन करावा लागतो.परंतु कर सल्लागार ३६५ दिवस प्रचंड तणावाखाली काम करत असतात. अनेक वेळा चुका सुद्धा होऊ शकतात. एखादी महत्त्वाची माहिती सुद्धा फॉर्ममध्ये राहू शकते. अशावेळी येणारे नोटीसला उत्तर देणे म्हणजे त्रासदायक होते. कर सल्लागार महसूल गोळा करण्यात मदत करून राष्ट्रनिर्मानात त्यांचा खूप मोठा वाटा आहे.मागील तीन वर्षापासून खूप ताण या लोकांवर वाढला आहे. त्यात फॉर्म अपलोड करताना जीएसटी व इन्कम टॅक्स ची साईट जाम होणे किंवा ओटीपी साठी फक्त दहा मिनिटांचा अवधी देणे. यात वेळ खूप जातो. प्रत्येक व्यवहार बारीक-सारीक तपशिलासह अपलोड करणे त्यामुळे त्रासात वाढ झाली आहे. जीएसटी अंतर्गत आयटीसी मुळे कामाचे त्रास वाढले आहे.अशा अनेक अडचणी मुळे कर सल्लागार एक भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. यामुळेच पूर्ण भारतभर सर्व कर सल्लागार संघटना यांनी खासदारांना निवेदन आले असून त्यांनी ते असोसिएशनच्या वतीने अर्थमंत्र्यांना द्यावे अशी संघटनेनी विनंती केली आहे.२९ जानेला जीएसटी ऑफिस मध्ये सुद्धा निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण, नाशिक कर सल्लागार असोसिएशन चे अध्यक्ष सुनील देशमुख, उपाध्यक्ष निवृत्ती मोरे व सेक्रेटरी राजेंद्र बकरे आदी उपस्थित होते.