शाळांनी जादा शुल्क आकारल्यास आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा इशारा
शाळांनी जादा शुल्क आकारल्यास आंदोलन

नाशिकरोड । प्रतिनिधी | Nashik Road

दहावीचा निकाल (SSC result) लागला असून सर्व शाळांमध्ये (schools) नविन शैक्षणिक वर्षाची (New academic year) सुरुवात झाली आहे. शहर परिसरातील अनेक अनुदानित शाळांमधुन (Aided schools) पालकांकडून विकास निधी (Development Fund) व इतर निधींच्या नावे अतिरिक्त शुल्क वसुल (Additional charges charged) करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.

पालकांची लूट न थांबल्यास आंदोलन (agitation) करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष शाम गोहाड (District President of Maharashtra Navnirman Vidyarthi Sena Sham Gohad) यांनी पत्रकाव्दारे दिला आहे. पत्रकाचा आशय असा- अनेक संस्था आपल्या शाळेतून पुस्तके व शालेय साहित्य (Books and school supplies) तसेच गणवेश खरेदी करण्यास पालकांना सक्ती करीत असून त्यासाठी अव्वाच्या सव्वा किंमत लावत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.

दोन वर्षांच्या करोना निर्बंधांमुळे आर्थिक स्थिती बिघडलेले अनेक पालक आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक नुकसानीच्या भीतीपोटी तक्रार करायलाही घाबरत आहेत. अशा वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) शिक्षण सम्राटांच्या या मुजोरी विरोधात आवाज उठविला आहे. पालकांनी या विरोधात मनविसेकडे तक्रार करावी.शैक्षणिक संस्थांनी वाढीव शुल्क वसुली व शालेय साहित्य शाळेतूनच घेण्याची सक्ती थांबविली नाही तर मनविसेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com