कांद्याच्या माळा घालून मोर्चा

कांद्याच्या माळा घालून मोर्चा

येवला | प्रतिनिधी | Yeola

कांद्याला (onion) मिळत असलेला भाव यातील फरक शेतकर्‍यांना अनुदान (Grants) स्वरूपात देण्यात यावा, नाफेड ची खरेदी आणि मिळालेल्या भावातील चौकाशी करून दोषींवर कार्यवाही करावी, शेतकर्‍यांनाचे (farmers) प्रलंबित अनुदान (Pending grants), पीक विमे (Crop insurance) त्वरित अदा करावे,

तथा पावसाळी हंगाम (rainy season) सुरू होत असल्याने शेतकर्‍यांना खते ,बी बियाणे योग्य दरात उपलब्ध व्हावेत य मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या (Prahar Shetkari Sanghatna) कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून मोर्चा काढला. तसेच मागण्यांचे निवेदन (memorandum) प्रांतांधिकारी (Prefect) व तहसीलदारांंना (Tehsildar) दिले

शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत केंद्र सरकार (central government) उदासीन असून शेतमालाच्या किंमती पाडण्यासाठी निर्याती बाबतचे धरसोडीचे धोरण अवलंबून निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे शेतकरी (farmers) अडचणीत सापडला आहे. या बाबत त्वरित निर्णय न घेतल्यास शेतकरी आंदोलन (agitation) तीव्र करतील, असा इशारा प्रहार शेतकरी (Prahar Shetkari Sanghatna) निवेदनाद्वारे (memorandum) तहसीलदार व प्रांताधिकारी यांना दिला आहे.

याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana),व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती (All India Corruption Eradication Struggle Committee), येवला यांच्या वतीने प्रहारच्या निवेदनास जाहीर पाठिंबा देण्यात आला. प्रहार संघटनेचे हरिभाऊ महाजन,भ्रष्टाचार निर्मुलन समिती चे हितेश दाभाडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रावण देवरे,अमोल फरताळे, किरण चरमळ,सुनिल पाचपुते, शंकर गायके,वसंत झांबरे, प्रवीण गायकवाड, रामभाऊ नाईकवाडे, भागवत भड ,योगेश इप्पर,विजय इप्पर, संदीप कोकाटे,बापूसाहेब शेलार, पांडू शेलार,श्याम मेंगाने आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेक इन इंडिया ची टिमकी वाजविणारे सरकार सतत शेतमालाची अनावश्यक आयात करून शेतकरी मातीत घालण्याचे धोरण अवलंबवित आहे.परदेशात जाऊन जगाला अन्नधान्य पुरविण्यास भारत सक्षम असल्याचा डंका पिटला जात असतानाच गव्हावर निर्यात बंदी लादल्या गेली, अतिरिक्त उत्पादनामुळे गाळपा अभावी शेतकर्‍यांना ऊस पेटवून द्यावा लागत असतांना साखरेवर कश्याच्या आधारावर निर्बंध लादले जातात. 2022पर्यंत शेतकर्‍यांच उत्पन्न दुप्पट करण्याच आश्वासन देणार्‍या सरकारने 2022 संपेपर्यंत शेतकरीच संपविण्याचा घाट घातलाय

- हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना येवला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com