साहू, कोल्हे हत्याकांड निषेधार्थ आंदोलन

हिंदुत्ववादी संघटनांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
साहू, कोल्हे हत्याकांड निषेधार्थ आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा (BJP national spokesperson Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर पोस्ट (post) शेअर (Share) केल्यामुळे उदयपूर (Udaipur), राजस्थान (Rajasthan) येथील व्यावसायिक कन्हैय्यालाल साहू (Kanhaiyyalal Sahu) व अमरावती (Amravati), महाराष्ट्र (maharashtra) येथील औषध विक्रेते उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांच्या हत्याकांडाचा धिक्कार करत

आज विविध हिंदुत्ववादी संघटनांनी (Pro-Hindu organizations) अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ (Upper Collector's Office) धरणे आंदोलन (agitation) केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकार्‍यांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना (Union Home Minister) निवेदन (memorandum) देण्यात येऊन हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

देशात कट्टरता वाढल्याने हिंदूंवर योजनापूर्वक हल्ले होत असल्याबद्दल निवेदनात (memorandum) तीव्र चिंता व्यक्त करण्यात अली आहे. नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर (social media) पोस्ट शेअर केली म्हणून उदयपूर (राजस्थान) येथील टेलर व्यावसायिक कन्हैयालाल साहू व अमरावती (महाराष्ट्र) येथील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांच्या निर्घृणपणे हत्या करण्यात आल्या. दोन्ही घटनेतील काही आरोपींना अटक करण्यात आली असून आता तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला आहे. तथापि सदर घटनांमागे असलेल्या आतंकवादी संस्था-संघटनांचा शोध घेऊन त्यांच्यावरदेखील कायदेशीर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उदयपूर (Udaipur) व अमरावती (Amravati) येथील हत्येच्या घटनेतील इतर आरोपींचा शोध घेऊन त्यांनादेखील अटक करण्यात यावी व खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. सदर घटनेतील आरोपींना प्रेरित करणार्‍या व आर्थिक सहाय्य पुरवणार्‍या संस्था-संघटनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी. याबाबत सरकारने त्वरित निर्णय घेऊन कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

आंदोलनात सुरेश निकम, सुनील गायकवाड, नितीन पोफळे, दादा जाधव, प्रदीप बच्छाव, देवा पाटील, मदन गायकवाड, विवेक वारुळे, सतीश कजवाडकर, मच्छिंद्र शिर्के, नाना मराठे, भारत म्हसदे, जगदीश गोर्‍हे, पोपटराव लोंढे, ओमप्रकाश हेडा, सुनील चौधरी, भरत बागुल, विजय देवरे तसेच भाजप, विश्व हिंदू परिषद, रा.स्व. संघ, बजरंग दल, वंदे मातरम् आदी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com