कत्तलखाने बंद करण्यासाठी मोर्चा
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

कत्तलखाने बंद करण्यासाठी मोर्चा

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamner

गोमांस प्रकरणात सहभागी असलेल्यांना तडीपार करा, शहरात सुरू असलेले कत्तलखाने बंद करावे या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन (Agitation) करत प्रशासनाचा निषेध केला...

पोलिसांनी शनिवारी रात्री अवैधरीत्या चालवल्या जाणार्‍या कत्तलखान्यावर छापा टाकून 1 कोटी 4 लाखांचे गोमांंस जप्त (Beef seized) केले. राज्यात गोवंश हत्याबंदी असताना संगमनेरात सुरू असलेले कत्तलखाने बंद करावे, यासाठी काल शिवाजी पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला.

मोर्चात भाजपचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख आप्पा केसकर, अमोल खताळ, एस. झेड. देशमुख, जयवंत पवार, कैलास वाकचौरे, शहरप्रमुख अमर कतारी, घनश्याम जेधे, दीपक साळुंके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रांताधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत सर्वच नेत्यांनी प्रशासनाचा निषेध केला. मुख्याधिकारी येत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा कार्याकर्यात्यांनी घेतला.

आंदोलनकर्त्यांना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे सामोरे गेले. मात्र आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम होते. प्रशासनाच्या निषेधार्थ आज संगमनेर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Related Stories

No stories found.