पाण्यासाठी रास्ता रोको

पाण्यासाठी रास्ता रोको

पांगरी । वार्ताहर | Pangri

कडवा कालव्याच्या (kadva canal) आवर्तनाने पांगरी बुद्रुक (Pangri Budruk) पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) विहिरीजवळील तळे भरावे, या मागणीसाठी शेतकरी संघटना (Farmers Association) व ग्रामस्थांच्यावतीने पांगरी येथे शिर्डी मार्गावर (shirdi road) रास्ता रोको आंदोलन (agitation) करण्यात आले.

कड़वा कालवा विभागाचे उपअभियंता मिलिंद बागूल (Deputy Engineer Milind Bagul) यांना निवेदन (memorandum) देण्यात आले. कडवा कालव्याद्वारे 1 जानेवारीपासून आवर्तन सोडण्यात आले.

गेल्या 40 दिवसापासून हे आवर्तन चालू असूनही अद्यापपर्यंत पांगरी बुद्रूक येथील पंचाळे शिवारातील पाटाला लागून असलेल्या तळ्यापर्यंत पाणी पोहोचलेले नाही. पाणीपुरवठा योजनेच्या सार्वजनिक विहिरीला (Public wells) पाणी (water) राहिलेले नाही.

त्यामुळे गावात महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई (Water scarcity) भासत आहे. ग्रामपंचायतीने कडवाच्या कार्यालयात दोन वेळा पाणी मागणी पत्र दिले. तरीही कुठलीही दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, सरपंच स्मिता निकम, उपसरपंच बाबासाहेब पगार, विलास निरगुडे, विश्वनाथ पगार, शांताराम पगार, रवींद्र पगार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com