पंचवटी : भाजपच्या वतीने लाक्षणिक उपोषण

राज्यातील मंदिरे सुरू करण्याची मागणी
पंचवटी : भाजपच्या वतीने लाक्षणिक उपोषण

पंचवटी | Panchavti

राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीच्यावतीने राज्यभर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर पंचवटीतील श्री कपालेश्वर मंदिराच्या बाहेर भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

महाराष्ट्र ही संताची भुमी आहे याच मातीत थोर संत होऊन गेले अशा महाराष्ट्रातील देवालय राज्यसरकारने बंद केले आहेत भाविकांना मंदिरात जाऊन हरीनामात तल्लीन होण्यास विरोध करत दारु दुकाने सुरु करुन दारु पिऊन टल्ली होण्यासाठी दारु दुकानांना परवानगी दिली आहे.

यावेळी महाराष्ट्रातील जनतेच्या धार्मिक भावना दुखावणा-या ठाकरे सरकारचा निषेध करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. सरकारच्या आडमुठेपणा

मुळे मंदिरावर विसंबून असलेल्या प्रसाद साहित्य विक्रेते ,फुल माळा विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आसुन झोपी गेलेल्या राज्यसरकारला जाग कधी येणार असा सवाल आंदोलकांनी यावेळी केला.

कपालेश्वर मंदिरासह गंगागोदावरी मंदिर तसेच नारोशंकर मंदिराच्याबाहेरही काही आंदोलकांनी लाक्षणिक उपोषण केले.

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, सुनिल केदार, सतिश शुक्ल आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com