
नाशिक | Nashik
गेल्या काही वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वॉटरग्रेस कंपनीच्या माध्यमातून शेकडो कर्मचारी नाशिक शहराची स्वच्छता (Cleanliness) करत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून वॉटरग्रेस कंपनी (Watergrace Company) आणि कर्मचारी यांच्यात वाद सुरू आहे. त्यातच एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला होता.
त्यानंतर आता मनसेच्या (MNS) नेतृत्त्वात ४५० कर्मचाऱ्यांना (Employees) कामावरून काढून टाकल्याने नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर वॉटरग्रेस कंपनीच्या ३५० कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण (Hunger Strike) सुरू केले आहे. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. यावेळी वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेने हस्तक्षेप करून न्याय द्यावा. तसेच कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, वॉटरग्रेस कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण (Beating) केल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मनसे तुमच्या पाठीशी असून येत्या काळात तुम्हाला अडचण आल्यास हाक मारा असे आवाहन करत मनसे पाठीशी राहील अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता मनसेने नेतृत्व करत उपोषणाला पाठिंबा दिला आहे.