सुरक्षारक्षक कामगार सेनेची निदर्शने

सुरक्षारक्षक कामगार सेनेची निदर्शने

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय सुरक्षारक्षक कामगार सेनेचे ( Bhartiya Surksha Rakshak Kamgar Sena)अध्यक्ष सचिन राऊत यांच्या नेतृत्वाखाली, सह. कामगार आयुक्त लोखंडे यांना सुरक्षारक्षक कामगारांचे मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी तीव्र निदर्शने आंदोलन छेडण्यात आले.

सह कामगार आयुक्त लोखंडे यांनी सुरक्षारक्षकांच्या प्रमुख मागण्या कामगार मंत्री महोदय यांच्याबरोबर लवकर मिटींग लावून पंधरा दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भारतीय सुरक्षारक्षक कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन राऊत यांनी सांगितले की, 15 ते 20 दिवसांत सुरक्षारक्षक कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कामगार मंत्री यांच्या निवासस्थानी समस्त सुरक्षा रक्षक कामगार व भारतीय कामगार सेना यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, बांद्रा कुर्ला संकुल येथे मोठ्या संख्येंने कामगार उपस्थित होते.

सुरक्षा रक्षकांच्या प्रमुख मागण्या-बृहनमुंबई / ठाणे , नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षकाची वेतन वाढ तातडीने करण्यात यावी. 15 जिल्ह्यांतील सुरक्षारक्षक मंडळे एकत्री करून एकच महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक मंडळ करण्यात यावे.

सर्व जिल्हातील मंडळामध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाचा पीफ हा भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करण्या यावा. सर्व मंडळामध्ये कार्यरत असलेल्या नाशिक , जळगाव अंतर्गत धुळे, नंदुरबार मंडळातील सुरक्षा रक्षकाना ड्युटीवर लागणारे गणवेश, हिवाळी स्वेटर, पावसाळी रेनकोट, गम बुट, चांबडी बुट, बॅट्री, बॅग काठी इत्यादी वस्तू तातडीने मिळण्यात याव्या. सर्व मंडळातील कार्यरत असलेले सुरक्षा रक्षकाची दरामहा वेतनाची 15 तारखेच्या आत निश्चित करण्यात यावी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com