विद्यार्थी हितासाठी शिक्षक समितीचे आंदोलन

विद्यार्थी हितासाठी शिक्षक समितीचे आंदोलन

निफाड | प्रतिनिधी | Niphad

शासनाने (Government) विद्यार्थ्यांच्या (Students) प्रश्नाला प्राधान्य देऊन त्याची सोडवणूक करावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे (Dr. Archana Pathare), जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर (Balasaheb Kshirsagar) यांना देत आमच्या भावना शासनापर्यंत पोहचवाव्यात व विद्यार्थी हिताला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे (Primary Teachers Committee) माजी राज्याध्यक्ष काळू बोरसे यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकार्‍यांनी निफाड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Agitation) करून विद्यार्थी निगडित प्रश्नांची हाक शासन दरबारी पोहोचविण्यासाठी सरकारचे लक्ष वेधले.

शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वत:च्या न्याय हक्कासाठी सर्वच प्रयत्नशील असतात पण ज्या विद्यार्थ्यांच्या भरवशावर आमचे भविष्य अवलंबून आहे त्यांचा विचार करणारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही एकमेव संघटना आहे. म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन आज राज्यभर आंदोलनाचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करीत आहोत.

अनेक वर्षापासून प्राथमिक शाळेतील मुलींना उपस्थित भत्ता फक्त 1 रुपयाच मिळतो. गोरगरीबांच्या फक्त काहीच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळतो. त्यामुळे सदरचा गणवेश सर्वच विद्यार्थ्यांना देण्यात यावा. भेदहीन समाज निर्मितीची कास धरणार्‍या पुरोगामी महाराष्ट्रात अशा अनेक विद्यार्थी निगडीत प्रश्नांची हाक शासन दरबारी पोहोचवून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळू बोरसे यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच वाढत्या महागाईत आमचा महागाई भत्ता दरमहा 5 ते 6 हजारांच्या वर वाढला पण शिक्षक सेवकांचे मानधन मात्र अगदी अत्यल्प फक्त 6 हजार त्यामुळे वेतन आयोगातील तफावत, दरमहाचा वेतन विलंब, भविष्य अंधारमय करणार्‍या 2005 नंतरची पेंशन योजना यासह अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सदर आंदोलन करण्यात आल्याची माहिती शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संजय गवळी यांनी दिली.

याप्रसंगी शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष केदू देशमाने, राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कर्डीले, विभाग संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाणके, तालुका नेते अविनाश बागडे, साहेबराव पवार, रमेश गांगुर्डे, दत्तू सानप, उत्तम सोनवणे, शिवाजी शिंदे, तालुका अध्यक्ष संजय गवळी, खंडू किट्टे, संदीप गायकवाड, भगवान बर्डे, श्रीकांत देवरे, केदू साळवे,

विजय शिंदे, सोमनाथ मुरकुटे, प्रशांत खोलासे, शिक्षक संघाचे राज्य चिटणीस निंबा बोरसे, संतोष मेमाणे, शंकर सांगळे, संजय गांगुर्डे, भास्कर भदाणे, ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघटनेचे संजय बैरागी, बाळकृष्ण पठाडे, जुनी पेन्शन हक्त संघटनेचे रामदास चोभे, नवनाथ सुरवाडे, दत्ता कांदळकर आदींसह तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com