सिन्नर नगरपरिषद सेवकांचे काम बंद आंदोलन

सिन्नर नगरपरिषद सेवकांचे काम बंद आंदोलन

सिन्नर | वार्ताहर | Sinnar

ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे (Somnath Palve) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सिन्नर नगरपरिषदेच्या (Sinnar Municipal Council) अधिकारी व सेवकांनी काम बंद आंदोलन (Agitation) पुकारले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली....

पिंगळे व पाळवे हे अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना येथील अमरजीत यादव (Amarjit Yadav) यांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करुन गंभीर दुखापत केली. यामध्ये पिंगळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून खाली पडली.

तर उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचे अंगरक्षक पालवे यांच्या डोक्यात खोल जखम झाली व हाताचा अंगठा तुटला. यानंतर पिंगळे यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर पालवे यांची प्रकृती चिंताजनक आहे.

एका महिला अधिकार्‍यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही चिंताजनक बाब असून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सिन्नर नगरपरिषदेच्या सर्व कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारत घटनेचा निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होत असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

यावेळी मुख्याधिकारी संजय केदार (Sanjay Kedar) यांच्या सहीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी नितीन परदेशी, अनिल जाधव, अमित घुले, सुदर्शन लोखंडे, सचिन कापडणीस, आकाश शिंदे, अजय कोलते, समाधान सातपूते, संजय चव्हाण, निवृत्ती चव्हाण, दीपक पगारे यांच्यासह अधिकारी, सेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com