शिवसेनेचे आंदोलन; तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन

शिवसेनेचे आंदोलन; तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन

वलखेड । वार्ताहर | Valkhed

वेदांत फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) यांच्या संयुक्तरीत्या सेमीकंडक्टर (Semiconductor) बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून (maharashtra) या निष्क्रिय सरकारच्या हलगर्जीपणामुळे गुजरातला (gujrat) वळविण्यात आला

या प्रकाराच्या निषेधार्थ सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून दिंडोरी (dindori) येथे शिवसेनेतर्फे (shiv sena) व युवा सेनेतर्फे (yuva sena) या प्रकाराचा जाहीर निषेध नोंदवत तहसीलदारांना (tahsildar) निवेदन (memorandum) देण्यात आले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील (Shiv Sena district president Sunil Patil) व तालुकाप्रमुख पांडूरंग गणोरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात येऊन तहसीलदार पंकज पवार (Tehsildar Pankaj Pawar) यांना निवेदन देण्यात आले. पदाधिकारी व शिवसैनिक युवा सैनिक यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली.

महाराष्ट्रात (maharashtra) येणारा वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) उभारण्यासाठी तात्काळी महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Govt) पुरेपूर प्रयत्न केले मात्र सत्तांतर नाट्य सुरू असतानाच अचानकपणे हा फॉक्स कॉन वेदांताचा सेमी कंडक्टर (Semi conductor) बनवण्याचा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव (talegaon) येथे होणार होता, तो महाराष्ट्रातून गुजरातला (gujrat) गेला.

या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 54 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प गेल्यामुळे एक लाख तरुणांना रोजगार निर्माण होणार होता प्रचंड रोजगार (Employment) निर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला कसा त्याबद्दल या निष्क्रिय सरकारचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात येऊन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली व तहसीलदारांना निवेदन (memorandum) देण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमखि सुनील पाटील यांनी सांगितले की, राज्यकर्ते फिरण्यात व सण साजरे करण्यात मशगुल आहेत तर राज्यातून असे मोठे प्रकल्प बाहेर जात आहेत हा अतिशय गंभीर प्रकार आहे असे प्रकल्प महाराष्ट्रातून जाणार असतील तर शिवसेना शांत बसणार नाही असे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी सांगितले.

तालुकाप्रमुख पांडूरंग गणोरे यांनी सांगितले की, फॉक्सकॉन वेदांत असा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला यासाठी जबाबदार असणार्‍या राज्य सरकारने पुढील काळात योग्य धोरण अवलंबले नाही तर शिवसेना या विरोधात शिवसेना स्टाईल आंदोलन करेल या सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळी जिल्ह्यात तालुक्यात शहरात निषेध स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येऊन निषेध नोंदवत आहोत असे ते म्हणाले.

यावेळी उपजिल्हा संघटक सतीश देशमुख, विधानसभा संपर्कप्रमुख सुनील मातेरे, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, तालुका संघटक अरुण गायकवाड, युवा सेना जिल्हाप्रमुख नदीम सय्यद, जिल्हा समन्वयक संगम देशमुख, उपजिल्हा अधिकारी किरण कावळे, युवा तालुकाप्रमुख निलेश शिंदे, उपतालुकाप्रमुख अमोल कदम, शहरप्रमुख संतोष मुरकुटे, उत्तम उगले, सोनू देशमुख आदी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com