'या'कारणामुळे रेल्वेस्थानकावर सेनेचा राडा

'या'कारणामुळे रेल्वेस्थानकावर सेनेचा राडा

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

मातोश्रीवर (Matoshri) हनुमान चालीसा (hanuman chalisa) पठण करण्यासाठी खा. नवनीत राणा (MP Navneet Rana) व आ रवी राणा (ravi rana) विदर्भ एक्स्प्रेसने (Vidarbha Express) मुंबईकडे (mumbai) जात असल्याचे समजताच शिवसैनिकांनी (shiv sainik) मनमाड रेल्वेस्थानकावर (Manmad railway station) धाव घेत राणा दाम्पत्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

संतप्त शिवसैनिकांनी प्रचंड गोंधळ घालून डब्यात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. राणा दाम्पत्य गाडीत नसल्याचे कळल्यानंतर मात्र शिवसैनिकांनी आंदोलन (agitation) मागे घेतले. राणा दाम्पत्यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांना शिवसेनेकडून कडाडून विरोध केला जात आहे.

राणा दाम्पत्य गुरुवारी रात्री विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जात असल्याची माहिती मिळाल्याने शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रेल्वेस्थानकावर धाव घेऊन प्रचंड गोंधळ घातला. यावेळी शिवसैनिकांनी उध्दव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, यासह राणा दाम्पत्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राणा तुम्ही बाहेर येता की आम्ही आत येऊ; अशा घोषणा देत हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) पठण केले. अचानक घडलेल्या या प्रकाराने रेल्वे पोलीस (Railway Police) व आरपीएफ (RPF) जवानांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

राणा दाम्पत्य गाडीत नसल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी संतोष बळीद, राजाभाऊ भाबड, सुनिल पाटील, संजय कटारिया, सुभाष माळवतकर, जाफर मिर्झा, छोटू धाकराव, दिनेश घुगे, अमीन पटेल, अंकुश गवळी, योगेश इमले, आशू पोहाल, सचिन दरगुडे, सिद्धार्थ छाजेड, योगेश शर्मा, आशिष पराशर, महेंद्र गरुड, कय्याम सैय्यद, अमजद शेख, बंटी आव्हाड, दीपक खैरे, दीपक मौर्य, ऋतिक मंगवाणा, संदीप गिरमकर, रिपाई नेते राजभाऊ अहिरे आदिंसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.