देवळ्यात कांदा प्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक

देवळ्यात कांदा प्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक

देवळा | प्रतिनिधी | Deola

येथील पाच कंदिल चौकात कांदा भाव प्रश्नी शेतकरी संघटनेच्या वतिने तालुका अध्यक्ष माणिकराव निकम यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले...

यावेळी संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार दिनेश शेलूकर व पो.नि. दिलिप लांडगे यांना देण्यात आलेल्या निवेदनात राज्य व केंद्र शासनाने कांदा निर्यात खुली करावी, कांद्याला तीन हजार भाव द्यावा, दिवसा विज द्यावी, सिबील अट रद्द करावी, रासायनिक खतासोबत लिंकिंग बंद करुन मुबलक खत पुरवठा करावा, अतिवृष्टीतील पिकांच्या नुकसानिचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनास कांदा उत्पादक, प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला.यावेळी कुबेर जाधव, जयदिप भदाणे, कृष्णा जाधव, राजू शिरसाठ, सुनिल पगार आदिंसह मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com