कांदा उत्पादकांचा रास्तारोको

सचिवांच्या मध्यस्थीनंतर व्यापार्‍यांकडून लिलाव सुरू
कांदा उत्पादकांचा रास्तारोको

सटाणा । प्रतिनिधी | Satana

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) विक्रीस आलेल्या कांद्याचा (onion) 11 वाजेपर्यंत लिलाव (auction) न झाल्याने

संतप्त शेतकर्‍यांनी (farmers) बाजार समिती प्रवेशद्वारासमोर सटाणा-मालेगाव रस्त्यावर (Satana-Malegaon road) रास्ता रोको आंदोलन (agitation) केले. शेतकर्‍यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.

बाजार समितीत गुरूवारी कांद्याचा लिलाव (Onion auction) सुरळीत झाला. काल (दि. 19) सुट्टी जाहीर केलेली नसल्यामुळे शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता. सकाळी 9 वाजता लिलाव सुरू होण्याच्या अपेक्षेने शेतकर्‍यांनी (farmers) लिलावासाठी कांदा जमिनीवर ओतला. परंतू 11 वाजले तरी व्यापारी लिलावासाठी आले नाहीत. याबाबत शेतकर्‍यांनी चौकशी केली असता सुट्टी असल्याचे सांगण्यात आले.

कांद्याला आधीच कवडीमोल भाव मिळत असून विक्रीस आणलेला कांदाही (onion) ओला होत असतांना व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची अडवणूक होत असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकर्‍यांनी सटाणा-मालेगाव रस्त्यावर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण झाली. बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे (Market Committee Secretary Bhaskar Tambe) यांनी आंदोलनस्थळी धाव घेत शेतकर्‍यांच्या तीव्र भावना समजून घेतल्या.

त्यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाची (agitation) व्यापार्‍यांना कल्पना देत तातडीने लिलावासाठी पाचारण केल्यानंतर शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. दिवसभरात 900 हून अधिक वाहनांतून विक्रीस आलेल्या कांद्याचा लिलाव करण्यात आला. 1500 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com