वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn) केंद्र शासनाने (Central Government) गुजरातला (Gujrat) नेऊन घाट घातला व महाराष्ट्रातील जनतेला धोका दिल्याच्या निषेधार्थ येथील नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) वतीने महसूल आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येऊन आंदोलन (Agitation) करण्यात आले...

हा प्रकल्प महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या तळेगाव येथे होणार होता. परंतु, अचानक हा प्रकल्प गुजरातला पळविण्यात आला. प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर सुमारे एक लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असता.

हा प्रकल्प आता गुजरात येथे हलविण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळणार होता तो आता मिळणार नाही. हा प्रकल्प गुजरातला हलविण्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
उमराणेत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी

यावेळी केंद्रशासन व राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे, तालुका अध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
मोहदरी घाटात 'द बर्निंग कार'चा थरार, पाहा व्हिडीओ...

आंदोलनात नाशिकरोड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर निवृत्ती अरिंगळे, पुरुषोत्तम कडलग, योगेश निसाळ, जगदीश पवार, विक्रम कोठुळे, प्रशांत वाघ, चैतन्य देशमुख, मंगेश लांडगे आदी सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com