आश्वासनानंतर मनसेचे उपोषण स्थगित

आश्वासनानंतर मनसेचे उपोषण स्थगित

सटाणा । प्रतिनिधी Satana

मालमत्ता करामध्ये 50 टक्के सूट द्यावी याकरिता मनसेतर्फे सनपा प्रवेशव्दारासमोर उपोषण सुरु होते .

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी तसेच शहरवासियांचे आर्थिक चक्र संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने मालमत्ता करामध्ये 50 टक्के सूट द्यावी या मागणीसाठी मनसेतर्फे सनपा प्रवेशव्दारासमोर सुरू असलेले उपोषण लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.

येत्या सोमवार दि. 28 सप्टेंबररोजी सकाळी 11 वाजता सर्व नगरसेवकांच्या ऑनलाईन सभेत या संदर्भात मालमत्ता कराच्या माफी संदर्भात विषय सादर करण्यात येवून पाठींबा देण्यासंदर्भात कार्यवाहीचे आश्वासन सनपाच्या वतीने नगराध्यक्ष सुनिल मोरे यांनी दिले.

यावेळी मनसे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, सरचिटणीस मंगेश भामरे, मनविसे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com