महाविकास आघाडीचे लाक्षणिक उपोषण

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
महाविकास आघाडीचे लाक्षणिक उपोषण

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतीसह शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाले आहे अस्मानी सुलतानी संकटांनी त्रस्त शेतकर्‍यांचा अधिक अंत न पाहता शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच सरसकट पंचनामे करीत नुकसान भरपाई चे त्वरित वाटप करावे शेतमालावरील निर्यात बंदी उठविण्यासह कांदा उत्पादकांना त्वरित अनुदानाचे वाटप करावे अन्यथा शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरून व्यापक जन आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाँ तुषार शेवाळे यांनी येथे बोलताना दिला

तालुक्यात सुरू असलेल्या पावसाच्या अतिवृष्टीने खरीप पिकांसह कांदा तसेच फळबागांची झालेली अतोनात हानी निर्यात बंदीने शेतमालास मिळत असलेला कवडीमोल भाव लंपी रोगाचा फैलाव नाले बंधारे फुटल्याने शेतीची झालेली अतोनात हानी आदी गंभीर बनलेल्या परिस्थितीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व काँग्रेस महाविकास आघाडी तर्फे काल अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात येऊन नुकसान भरपाईची मागणी केली गेली

यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेर्धात महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकर्‍यां तर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन परिसर दणाणून सोडण्यात आला होता ङ्गयावेळी मार्गदर्शन करताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष डाँ तुषार शेवाळे यांनी केंद्र व राज्य शासनावर टीकेचे आसूड ओढले अतिवृष्टीने तालुक्यात शेती व्यवसाय पूर्णतः उध्वस्त झाला असून शेतकरी अस्मानी सुलतानी संकटात सापडले आहे अशा गंभीर परिस्थितीत शेतकर्‍यांना फक्त घोषणांद्वारे राज्यकर्त्यांद्वारे दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याने सर्वत्र असंतोष पसरला आहे शेतकर्‍यांना घोषणा देऊन नाही तर प्रत्यक्ष मदतीमुळेच दिलासा मिळणार आहे.

तालुक्यातील नाळे येथील बंधारा फुटल्याने देवाडपाडे येथील अनेक शेतकर्‍यांची पिकांचं शेतजमीन वाहून गेली आहे त्यामुळे लक्षावधी रुपयांचे नुकसान या शेतकर्‍यांचे झाले आहे मात्र यंत्रणेतर्फे साधे नुकसानीचे पंचानामे देखील झाले नसल्याने शेतकरी बांधव हताश झाले आहे अतिवृष्टी मुळे संपूर्ण तालुक्यातच शेती पिकांची वाताहात झाली आहे त्यामुळे शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करत सर्व शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आगामी काळात त्रिव आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा शेवाळे यांनी यावेळी बोलताना दिला.

मार्गदर्शन करताना काँग्रेस नेते प्रसाद हिरे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य डाँ जयंत पवार, अरुण देवरे तालुकाध्यक्ष संदीप पवार विनोद चव्हाण शिवसेना नेते प्रमोद शुक्ला रामा मिस्तरी जितेंद्र देसले बाळासाहेब बागुल किरण पगार आर डी निकम शेखर पवार कैलास तीसगे अँड चंद्रशेखर शेवाळे आदी नेत्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीकास्त्र सोडले.

तालुक्यात अतिवृष्टीने शेती उध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटाने हवादिल झाले आहे यामुळे राज्य सरकारने घोषणाबाजी न करता सरसकट पंचनामे त्वरित पूर्ण करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई चे वाटप करावे संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतमालावरील निर्यात बंदी तात्काळ उठविण्यात यावी कवडीमोल भाव मिळत असल्याने त्रस्त झालेल्या कांदा उत्पादकांना अनुदानाचे वाटप करावे पशुधन वाचविण्यासाठी लंपी रोगावरील लस थेट बांधावर मोफत देण्यात यावी बंधारे व तलाव फुटल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे या आपद ग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी खरीभंगामातील सर्व पिकांना नैसर्गिक आपत्ती निधी मिळावा तालुक्यातील रस्त्यांचे व पुलांचे मजबुतीकरण करण्यात यावे आधी मागण्याची राज्य शासनाने तात्काळ पूर्तता न केल्यास महाविकास आघाडी तर्फे व्यापक आंदोलन छेडले जाईल असा इशारा या नेत्यांनी मार्गदर्शन करताना दिला.

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले या आंदोलनात गिसाका माजी चेअरमन विजय पवार, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष धर्मा भामरे, शिवसेना महानगरप्रमुख राजाराम जाधव राष्ट्रवादी नेते अनंत भोसले नंदू सावंत किशोर इंगळे चंद्रकांत गवळी विठ्ठल बागुल मयूर वांद्रे महिला आघाडीच्या हेमलता मानकर वैशाली मोरे ज्योती नंदन सयाजी पवार अनिल पाटील, वाय के खैरणार आर के बच्छाव महेश शेरेकर रमेश बच्छाव नारायण हिरे मांगीलाल पवार भाऊसाहेब वाघ अशोक व्यालीज आदींसह राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com