
सिन्नर । वार्ताहर sinnar
येथील उपजिल्हा रुग्णालयातील सेवकांनी health workers of sub-district hospital काल आरोग्य विभागाचे उपसंचालकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन Agitation करत रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. वर्षा लहाडे Dr. Varsha Lahade यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उपसंचालकांना निवेदन देत केली.
गेल्या 7-8 महिन्यांपासून रुग्णालयातील सेवक डॉ. लहाडे यांच्या मनमानी कारभारविरुद्ध सबळ पुरावे देऊन त्यांच्या निलंबनाचा आग्रह धरत आहेत. आरोग्य विभागाला वारंवार निवेदने देऊनही कारवाई होत नसल्याने सेवकांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
आरोग्य विभागाकडून नावापुरती चौकशी केल्याचा आरोप सेवकांनी केला आहे. डॉ. लहाडे यांनी कोरोना काळात रेमडीसिव्हर, लस देतांना दूजाभाव केल्याचा सेवकांचा आरोप आहे. आपल्या मर्जीतल्या रुग्णांनाच ऑक्सिजन बेड देणे, खाजगी रुग्णालयाकडून परवानगीसाठी लाच घेणे असे आरोप सेवकांनी केले आहेत.
प्रशासन याकडे गांभीर्यान बघत नसून अद्याप त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित करीत डॉ. लहाडे यांच्यासारख्या अधिकार्यांना पाठीशी घालून आरोग्य विभाग काय साध्य करत आहे असा प्रश्न निवेदनात करण्यात आला आहे. कोरोना काळात रुग्णालयातील सेवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली असतांना डॉ. लहाडे या सेवकांच्या विरोधात सुडबुध्दीने कारवाई करीत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
डॉ. लहाडे यांच्यावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी करत या सेवकांनी आज उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. निवेदनाची प्रत जिल्हा शल्यचिकित्सक व भद्रकाली पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. यावेळी अॅड. अजिंक्य गिते, शुभम घुगे, संकल्प भालेराव, ज्योती गावीत, शितल रावल, मनुश्वेता पवार, देवेंद्र सोनवणे, गौरव सोनवणे, अनिल कासार, सचिन देशमुख, तेजस वायचळे, गौरव पवार, गणेश राऊत, राहूल सुर्यवंशी, योगेश माळी, विशाळ खडांगळे, केतन जाधव, आकाश पाटील, कृष्णा देशमुख यांच्यासह काही सेवक आंदोलनात सहभागी झाले.