घंटागाडी सेवकांचे आंदोलन

विविध मागण्यांबाबत आयुक्तांना निवेदन
घंटागाडी सेवकांचे आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC )घंटागाडी सेवकांनी ( Ghantagadi Workers ) महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन ( Rajiv Gndhi Bhavan ) प्रवेशद्वारावर आपल्या विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन केले. तसेच मनपा आयुक्त रमेश पवार यांना निवेदन देण्यात आले. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचेसह फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

नाशिक महानगरपालिका श्रमिक संघतर्फे आंदोलन करण्यात आले. नाशिक महापालिकेत 1996 सालापासून घंटागाडी सेवक कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. ठेकेदार बदलले तरी हेच सेवक काम करीत आहेत. कामगारांना 10 तारखेच्या आत मासिक वेतन अदा करणे, अत्यावश्यक साधनांची पूर्तता नियमित करणे बंधनकारक असून अटी-शर्तीमध्ये असे असताना त्याचे पालन होत नसल्याने महापालिकेचे रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट रद्द करण्यात आले व 7 वर्षाच्या कालवधीत कामगारांना कायम सेवेत वर्ग करणेत यावे, असे कामगार आयुक्त कार्यालयाने आदेश दिले आहे. त्याचे पालन न करताच पालीका टेंडर काढून वर्कऑर्डर देत आहे. याचा निषेध करण्यात आला. असे निवेदनात म्हटले आहे

त्याचप्रमाणे पंचवटी व सिडको (नवीन नाशिक) भागातील सन 2016 ते 17 या कालावधीतील किमान वेतनाची थकबाकी अनामत रकमेतून देणेबाबत पालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप केला आहे. घंटागाडी सेवकांना सात तारखेच्या आत वेतन अदा करण्यात यावे, किमान वेतन न देणार्‍या ठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची अट नमूद करावी, पावसाळा सुरू झाला असताना अद्याप रेनकोट देण्यात आलेले नाहीत ते देण्यात यावे, पंचवटी व नवीन नाशिक भागात गाड्यांचे मेंटेनेस प्रॉब्लेम गंभीर आहे त्यावर तातडीने उपाय करण्यात यावे, कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी तातडीची बैठक बोलवावी, आदी मागण्या करण्यात आले आहे. यावेळी उपाध्यक्ष महादेव खुडे यांचेसह शेकडो कामगारांनी आंदोलनात भाग घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com