कांदाप्रश्नी प्रहार संघटनेचा रास्ता रोको

कांदाप्रश्नी प्रहार संघटनेचा रास्ता रोको

बोलठाण । वार्ताहर | Bolthan

कांदा पिकांचे दर (Onion crop rates) कोसळून शेतकर्‍यांच्या (farmers) आर्थिक नुकसानीला केंद्र व राज्य शासन जबाबदार असून शासन धोरणाच्या निषेधार्थ बोलठाण उपबाजार समितीसमोर प्रहार शेतकरी संघटनेतर्फे (farmers organizations) रास्तारोको आंदोलन (agitation) करण्यात आले.

देशभरात कांद्याच्या कोसळलेल्या दराने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून ते हवालदिल झाले आहेत. कांद्याला अधिक भाव मिळावा तसेच मार्च व एप्रिल महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान (Grant) मिळाले पाहिजे, या मागणीकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांदगाव तालुक्याच्या (nandgaon taluka) घाटमाथ्यावरील बोलठाण येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने रास्तारोको आंदोलन (agitation) करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) बोलठाण उपबाजारात आलेले कांदा उत्पादक (Onion growers) शेतकरीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी व कार्यकर्त्यांनी कांद्याच्या ठिगांवर बसून तसेच गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले. प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष कैलास पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रताप सूर्यवंशी यांनी उपस्थितांना संबोधित करताना केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला. यावेळी प्रहारचे तालुका उपाध्यक्ष चंद्रभान झोडगे, जनार्दन भागवत, निवृत्ती सोनवणे, रविकांत भागवत, राहूल पवार यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com