कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे आंदोलन

कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्हा ग्रामीण 102 रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालकांना गेल्या चार महिन्यापासून पगार न झाल्याने त्यांची दिवाळी अंधारात होत असून केंद्र शासन पुरस्कृत सीएससी लिमिटेड दिल्लीच्या कंपनीने संबंधित सेवा पुरवठा करण्याचा ठेका घेतलेला आहे.

याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व संबंधित सीएससी कंपनीकडे पगार बाबत मागणी करूनही पगार दिला गेलेला नाही. याबाबत संबंधित कर्मचारी यांनी नाशिक जिल्हा परिषद गेटसमोर आंदोलन केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागात कंत्राटी स्वरूपात बाह्ययंत्रणेकडून 102 या रुग्णवाहिका साठी चालक बाह्ययंत्रणेकडून मानधनावर कार्यरत आहेत. हे वाहन चालक मानधनावर असतानाही दिवस रात्र 24 तास सेवा बजावत असतात.

पण ऐन दिवाळीच्या सणाला मानधन म्हणून असलेला पगार त्यांना मिळालेला नाही.त्यामुळे यांनी दिवाळीचा सण कसा साजरा करायचा? या बाबत संबंधित कर्मचारी यांनी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना भेटून याबाबत माहिती दिली आहे.तरी त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही.केवळ फक्त आश्वासन मिळत गेले. पगार अजूनही मिळाला नाही.

या रुग्णवाहिका चालकांना केवळ 11 हजार मानधन असून ते 24 तास काम करण्याच्या मानाने खूपच तुटपुंजे असून तेही वेळेवर 5 ते 6 महिने मिळत नाही.या सेवकांनी आपले कुटुंब चालवायचे कसे? या कंपनी ठेकेदाराकडून पीएफ आणि कुठलाही विमा मिळत नाही. याबाबत शासन लक्ष देणार का? कोविड महामारीच्या काळातही याच रुग्णवाहिका चालकांनी आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा प्रामाणिक केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्य विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे, ठेकेदार कंपनी ,लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन मानधन वेळेवर द्यावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com