आम आदमी पार्टीचे मनपा मुख्यालयासमोर आंदोलन

आम आदमी पार्टीचे मनपा मुख्यालयासमोर आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आम आदमी पार्टीतर्फे ( Aam Aadmi Party )मनपा मुख्यालयासमोर आज (दि. २२) आंदोलन करण्यात आले. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मनपाकडून ( NMC )कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्या कामात भ्रष्टाचार देखील होत असल्याचा आरोप यांनी केला आहे.

नाशिक शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. परिणामी, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहन चालक त्रस्त झाले असताना रस्ते दुरुस्तीची ठोस कामे होताना दिसत नाही.

गत काही दिवसांत नव्याने बांधलेल्या व दुरुस्त केलेल्या रस्त्यांचीदेखील दुरवस्था झाल्याचे दिसत आहे. ही बाब दुर्दैवी असून, सर्व रस्त्यांची दर्जेदार, खात्रीशीर कामे होण्याची गरज आहे. मागील पाच वर्षांत तयार झालेल्या सर्व रस्त्यांचे ऑडिट करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच कर भरणाऱ्या नाशिककरांची खड्ड्यांतून मुक्तता करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी माजी राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे, मध्य व पश्चिम विधानसभा अध्यक्ष राजेंद्र गायधनी, शहर सचिव जगबिर सिंग, पश्चिम विभागप्रमुख सतीश सांगळे, नविंदर आहलुवालिया, विलास देसले, विनायक येवले, संजय कातकाडे, राज कुमावत आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com