इगतपुरी : नऊ दिवसांपासून ३९ कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह आंदोलन

कंपनीकडून आमदारांना केराची टोपली
कामगार आंदोलन
कामगार आंदोलन

घोटी : Ghoti

गोंदे दुमाला येथील मॉसडोरफर कंपनीने १७ कामगारांना कुठलेही कारण न देता कामावरुन काढुन टाकल्याने त्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी सिटुचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीतील कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी भरपावसात आठ दिवसांपूर्वी कंपनी गेटवर ठिय्या आंदोलन केले होते.

मॉसडोरफर कंपनी कामगारांनी अंतर्गत युनियन सीटु सलग्न केल्याचा राग मनात धरुन कंपनी मेनेजमेन्टने बावीस कामगारांना कुठलेही कारण न देता कामावरून कमी केल्यामुळे कामगारांनी रितसर संपाची नोटीस देवुन संप पुकरला आहे. तसेच कंपनीतील कामकाज पुर्णपणे ठप्प झाल्याने आठ दिवसांपूर्वी तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर व माजी जि. प. सदस्य संदीप गुळवे, यांनी कंपनी मेनेजमेन्ट बरोबर बैठक केली होती.

त्या बैठकीत कंंपनी मॅनेजमेंटने येत्या आठ दिवसाच्या आत कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाचे लेखी आश्वासन आमदार हिरामण खोसकर व कामगारांना दिले मात्र कँपनी प्रशासनाने आमदारांना देखील केराची टोपली दाखवली आहे.

दरम्यान आज कँपनीने काढून टाकलेल्या २२ इतर ही कर्मचारी गेल्या नऊ दिवसांपासून कँपनीच्या गेटवर आंदोलन करत असून कंपनीत दांडकशाही करून आंदोलन हाणून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपस्थित महिलांनी केला आहे. आज सकाळ पासून कर्मचारी व त्यांचे कुटुंब पहाटे पाच वाजेपासून मुलाबाळांसमवेत बसले आहे. तरी ही कँपनी प्रशासना कुठल्याही प्रकाराची दखल घेत नाही. उलट कर्मचाऱ्यांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळी सिटूचे जिल्हा उपाध्यक्ष देविदास आडोळे यांनी ठाम भूमिका घेत जोपर्यत कंपनी प्रशासन कामगारांच्या पूर्ण अटी मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेतली.

यावेळी तहसिलदार परमेश्वर कासुळे व पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी मध्यस्थी केली. यावेळी कामगार वर्गाकडून किरतेश शेलार, विजेंद्र परदेशी, रोहिदास नाठे, वसंत नाठे, निवृत्ती गांगुर्डे, अमित देशपांडे, प्रवीण जगताप आणि कामगार वर्ग उपस्थित होते. तर बंदोबस्तसाठी पोलीस नाईक विलास धारणकर, पुंडलिक बागुल, सोमनाथ बोराडे, काकासाहेब निंबाळकर, अजय भोईर आदी पोलीस उपस्थित होते.

गेल्या आठ दिवसांपासून सर्व कर्मचारी आपल्या कुटुंबासह आंदोलन करत असून कंपनी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही त्यामुळे मॉसडोफर कँपनी कडून अन्याय होत आहे. आज तहसीलदार व पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून देखील कँपनी प्रशासन मुजोरी करत आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी आमदार हिरामण खोसकर यांनी देखील मध्यस्थी करून त्यांचा सुद्धा आज कँपनी प्रशासनाने अवमान केला आहे.

- कॉ. देवीदास आडोळे, सिटु कामगार नेते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com