रस्ता दुरुस्तीसाठी खड्यात आंदोलन

रस्ता दुरुस्तीसाठी खड्यात आंदोलन

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यातील नायगाव-ब्राम्हणवाडे (Naigaon-Bramhanwade) रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको करत रस्त्यावरील खड्यात बसून आंदोलन (Movement) केले.

वर्षभरापुर्वी ग्रामपंचायतीकडून हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला (Public Works Department) निवेदन (memorandam) देण्यात आले होते. मात्र, अद्याप कुठलीही कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचे (Movement) हत्यार उपसले आहे. सदर रस्त्याची पुरती वाट लागली असून रस्त्याने ये-जा करणे जिकरीचे झाले आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे (potholes) वाहनधारकांना प्रवास करताना कसरत करावी लागते. रस्त्यांवरील खड्डयांमुळे दुचाकीधारकांना जिव मुठीत घेऊन चालावे लागते.

खड्यांमुळे अनेकांचे किरकोळ, गंभीर अपघात झाले असून काहींना आपले जीवही गमवावे लागले आहेत. या रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली असूनदेखील अधिकारी व ठेकेदारांकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. संबधित विभागाला जाग यावी यासाठी ग्रामस्थांनी नायगाव परिसरात या रस्त्यावरील खड्यात बसून आंदोलन केले. रास्ता रोको करुन विविध घोषणा देण्यात आल्या.

आठ दिवसांत कामाची सुरुवात न झाल्यात संबधित अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घालण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी माजी उपसरपंच रोशन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान पिंपळे, विलास कर्डक, बंडू चव्हाण, भारत जेजूरकर, सौरभ बैरागी, बाळू खालकर, मदन भांगरे, दगडू जेजूरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com