पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर आंदोलन

पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर आंदोलन

विंचूर । वार्ताहर vinchur

येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात ( veterinary clinic )पशु वैद्यकाची (veterinarian ) नियुक्ती करण्यात यावी, यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या (Bharatiya Janata Party Kisan Morcha )वतीने आंदोलन करण्यात आले.

येथील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पशूधन आहे. तसेच विंचूर हे गाव मध्यवर्ती ठिकाण असल्याने परिसरातील शेतकरी देखील आपल्या आजारी जनावरांना येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात आणतात.

परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येेथे पशूवैद्यकच नाही. त्यातच खासगी पशूवैद्यक हे शेतकर्‍यांना सेवा देत होते. परंतु ते देखील संपावर असल्याने पशू पालकांची कुचंबणा होत आहे. पशू वैद्यकाअभावी काही जनावरे दगावली तसेच दुग्ध उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. परिणामी संतप्त पशुपालक व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने येथील पशु वैद्यकीय दवाखान्यासमोर आंदोलन करण्यात आले.

दरम्यान आंदोलकांच्या भेटीस आलेले नाशिक जि. प. पशुसंवर्धन विभागाचे सहा. आयुक्त आर.एस. महाजन यांना पशु वैद्यक नियुक्ती बाबत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सोपान दरेकर, किशोर पाटील, बाजीराव क्षीरसागर, समाधान ठाकरे, आण्णा ठुबे, मनोज पुंड, केदू साबळे, अनिल चव्हाण, शरद खैरे, राजू चव्हाण, लाला चव्हाण, राजेंद्र कानडे, प्रकाश चव्हाण, शरद मुदगुल, गणेश कदम, दत्तात्रय गुंजाळ, लहानू बिबे, वामन गायकवाड उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com