नगरपरिषदेसमोर प्रहारचे ठिय्या आंदोलन

नगरपरिषदेसमोर प्रहारचे ठिय्या आंदोलन

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

सरस्वतीला आलेल्या पूरामुळे (flood) नदीकाठच्या घरे वाहून गेल्याने शेकडो कुटुंब रस्त्यावर आले आहे. या पूरग्रस्तांना तात्काळ पक्के घरे मिळावी,

नदीपात्रातील अतिक्रमण (encroachment) हटवावी, नदीपात्र स्वच्छ करावे आदी मागण्यासांठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने (Prahar Janshakti Party) नगरपरिषद (nagar parishad) कार्यालसमोर ठिय्या आंदोनल (agitation) करत निवेदन (memorandum) देण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी सरस्वती नदीला (Saraswati River) आलेल्या पूराने अनेकांची घरे वाहून गेली. रात्रीच्या काळोखात त्यांच्यावर घाला झाल्याने प्रत्येक कुटुंब आज रस्त्यावर आले आहेत. सरस्वती नदी पात्रालगतच्या मातंगवाडी, अपना गॅरेज, मोफत नगर, भराडवाडी, जोशीवाडी, तांबेश्वर नगर, नारायण देव बाबा, काझीपुरा भागातील झोपडपट्टीतील रहिवाशांना याचा मोठा फटका बसला.

त्यामुळे या रहिवाशांना म्हाडा (Mhada), सिडको (CIDCO) या तत्सम योजना राबवून स्किम राबवून घर मिळावी, नगरपालिकेचे व नदी प्रवाहास अडसर ठरणारे गाळे हटवून नदीपात्र मोकळे करावे, नदीतील कचरा साफ करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तात्काळ अंबलबजावणी न झाल्यास महिलांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष शरद शिंदे, संदिप लोंढे, अमित शिंदे, गोपाळराव गायकर, सुनील महाराज, उत्तम लोंढे, भाजीपाला संघटना अध्यक्ष फुलाबाई धुमाळ, सखुबाई पाथरे, मिनाक्षी दोडके, ताराबाई कुलकर्णी यांच्यासह महिला व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com