
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
जिल्हा परिषद (zilha parishad) मधील लिपिक वर्गीयांची (clerical classes) वेतन त्रुटी (wage error) दूर न झाल्याने महाराष्ट्रातील सर्व लिपिक बांधवांमध्ये नैराश्याची भावना पसरली आहे. त्यामुळे तात्काळ या वेतन त्रुटी दूर कराव्या,
यासाठी महाराष्ट्रातील सर्व लिपिक (Clerk) बेमुदत आंदोलन (agitation) करण्याच्या पवित्र्यात आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना (Maharashtra State Zilha Parishad Clerk Class Employees Association) 615 जिल्हा शाखा नाशिकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद निरगुडे यांनी दिली. सातव्या वेतन आयोगामध्ये (Seventh Pay Commission) कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी होत्या. त्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी बक्षी समिती स्थापन करण्यात आली.
या समितीचा खंड दोनचा अहवाल प्रकाशित करण्यात आला असून त्यानुसार महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी (wage error) दूर करण्यात आल्या. यामध्ये चौथा वेतन आयोग, पाचवा वेतन आयोग, सहावा वेतन आयोग आणि सातवा वेतन आयोग यामध्ये जिल्हा परिषद (zilha parshad) मधील लिपिक वर्गीय संवर्ग हा सातत्याने वेतन त्रुटी दूर करण्यासाठी झगडत आहे.
खरंतर बक्षी समितीच्या अहवालामध्ये वरिष्ठ सहाय्यक पदाची वेतन त्रुटी दूर होण्याची फार मोठी अपेक्षा जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संवर्गाला होती.परंतु, आजच्या अहवालात जिल्हा परिषद मधील लिपिक वर्गीयांची वेतन त्रुटी दूर न झाल्याने महाराष्ट्रातील सर्व लिपिक बांधवांमध्ये नैराश्य पसरलेले आहे.तरी या वेतन त्रुटी दूर कराव्या, यासाठी महाराष्ट्रातील सर्व लिपिक बेमुदत आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
लवकरच जुनी पेन्शन योजना जिल्हा परिषद मधील लिपिक वर्गीय संवर्गाचा वेतन त्रुटी व आकृतीबंध मध्ये पदे कमी करणे यासाठी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मधील सर्व लिपिक लवकरच बेमुदत काम बंद आंदोलन करावे अशी सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे. शासनाने वेतन त्रुटी दूर करावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना 615 जिल्हा शाखा नाशिकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद निरगुडे यांनी केली आहे.