विंचूर-प्रकाशा रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन

भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचा इशारा
विंचूर-प्रकाशा रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन

Movement if Vinchur-Prakasha road is not repaired

देवळा | प्रतिनिधी

सटाणा - देवळा Satana- Devla शहरातून जाणार्‍या विंचूर - प्रकाशा महामार्गाची Vinchur- Prakasha Highway पूरती वाट लागली असून देवळा ते सटाणा हा पंधरा कि.मी.चा रस्ता हा अपवाद सोडला तर संपूर्ण महामार्ग खड्डयांनी चाळण Pits on Highway झाला आहे.

तसेच नाशिकला जाणारा देवळा - सोग्रस रस्ता अक्षरशः खड्यात गेला असल्याने यामार्गावरुन जाणार्‍या वाहनांसह वाहनधारकांना कसरत करत जीव मुठीत धरुन चालावे लागते. खड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

महामार्गावर टोलमुक्ती झाली पण खड्डे मुक्ती कधी, असा प्रश्न वाहनधारकांंना पडला आहे. विंचूर - प्रकाशा महामार्गावरील पिंपळनेर ते ताहाराबाद रस्त्याचे काम संथगतीने चालू असून पर्यायी रस्ते वाहन चालवण्या योग्य नाहीत. या महामार्गावरील रस्त्याची पूरती वाट लागल्याने वाहनचालकांनी इतर मार्गावरून जाणे पसंत केलेले आहे. त्यामुळे पेट्रोलपंंप, हॉटेल व्यवसायांवर परीणाम झाला.

गेल्या पंधरा दिवसापुर्वी संबंधित विभागाच्या वतीने काही ठिकाणी खड्यांमध्ये खडी व त्यावर माती मुरुम टाकून खड्ये बुजवण्यात आल्याचा देखावा केला गेला मात्र वाहनांच्या वर्दळीने व पावसाने माती, मुरुम वाहुन गेले व राहीलेल्या खड्यात मात्र अपघाताला अमंत्रण ठरु लागले आहे. रस्ताची तात्काळ दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनीदिला आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाचे अधिक्षक अभियंता सोनवणे यांना निवेदनात दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com