नाशिक । प्रतिनिधी

सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ , टीडी एफ सिन्नर तालुका शिक्षक परिषद यांच्यावतीने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना मानधन देण्यात यावे, यासाठी सिन्नर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार मराठे यांना निवेदन देण्यात आले .

सिन्नर तालुक्यातील १०० च्या वर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माध्यमिक विभागातील हजारो शिक्षकांनी निवडणुकीचे काम केले. आधीच्या रात्री सर्व खेडेगांवामधे आमचे सर्व शिक्षक निवडणुकीचे साहित्य घेऊन पोहचले .

काही ठिकाणी प्रचंड मच्छर ,लाईट नाही, पाणी नाही , जेवणाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी आमचे शिक्षक थांबले व संपुर्ण निवडणुकीचे काम प्रामाणिकपणाने पुर्ण केले. परंतु , सिन्नर तालुक्यातील एकाही कर्मचार्यास एक रुपया सुद्धा मानधन मिळाले नाही. मग मानधन गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

आठ दिवसात मानधन मिळाले नाही, तर तहसिल कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात येईल ,असा ईशारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष साहेबराव कुटे , टिडीएफ चे नेते व जिल्हा कार्यवाह किशोर जाधव शिक्षक परिषद नेते बाळासाहेब हांडे यांनी दिला आहे. निवेदन देतांना दौलत मोगल, संजय पाटील , दत्ता आदिक ' पी टी जाधव ,

एकनाथ खैरनार , एम बी चतुर , एस बी चिने , वसंतराव पैठणकर , आशुतोष आंदोरे , जिंतेद्र पाटील , बाळासाहेब सांगळे , जी.ए कोरडे , राजेंद्र मिठे , के आर काळे , आर एस काळे , बाळासाहेब खैरनार , योगेश . जाधव , देविदास गर्जे , आर के शेळके , राजाराम आव्हाड , किशोर सरवार , विलास शेळके आदी माध्यमिक शिक्षक मोठ्या संखेने उपस्थित होते .

यापुढेही मानधन न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा सिन्नर तालुका शिक्षक आघाडीच्यावतीने ण्यात आला.