सर्व पक्षीय रास्ता रोको; रखडल्या मेनरोड कामामुळे संताप

सर्व पक्षीय रास्ता रोको; रखडल्या मेनरोड कामामुळे संताप

कळवण । प्रतिनिधी | Kalwan

गेल्या तीन वर्षांपासून कळवण (kalwan) शहरातील मुख्य रस्ता (main road) असलेल्या मेनरोडचे काम संबंधित ठेकेदाराकडून संथगतीने सुरू आहे.

या विरुध्द व्यापारी महासंघाच्या (Federation of Merchants) वतीने पुकारण्यात आलेल्या कळवण बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिड तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे संबंधित यंत्रणा व ठेकेदाराकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडले.

मेनरोडच्या अर्धवट अवस्थेतील कामामुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य, वेळोवेळी अपघात होऊन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सार्वजनिक बांधकाम खाते (Public Works Department) व स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्यांनी बघत असतांना व्यापारी वर्ग आक्रमक झाला. कळवणच्या व्यापारी वर्गाला पहिल्यांदाच रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याने सर्वप्रथम कळवण तालुका (kalwan taluka) शिवसेनेने (shiv sena) पाठिंबा दिला.

हे पाहून सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक, शेतकरी, ग्रामस्थांनी या आंदोलनाला (agitation) पाठींबा दिला. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड (Sub-Divisional Police Officer Amol Gaikwad), तहसीलदार बंडू कापसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, रवींद्र देवरे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या साक्षीने ठेकेदार व संबंधित यंत्रणेची महत्वपूर्ण बैठक होऊन 45 दिवसात गुणवत्ता राखत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन यावेळी देण्यात आले.

रास्ता रोको आंदोलनात (agitation) शहरातील सर्वच व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी दिपक महाजन, विलास शिरोरे,अंबादास जाधव, विजय जाधव, राजेंद्र पवार, रवींद्र देवरे, महेंद्र हिरे, हेमंत पाटील, बेबीलाल संचेती, जयश्री पवार यांनी उपस्थितांसमोर आपली भूमिका मांडून या आंदोलनाचे समर्थन केले. संबंधित ठेकेदाराकडून होणार्‍या विलंबाबाबत व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी वेळोवेळी आमदार, खासदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना कळविले आहे. त्यावरून काही दिवस काम सुरू होते तर अनेक दिवस ते विविध कारणांनी पुन्हा बंद पडते.

सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित ठेकेदाराकडून हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने येथील व्यापारी संतप्त झाले. व्यापारी वर्गाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार व्यापारी महासंघाने कळवण बंदचे आवाहन केले होते. लोकशाही मार्गाने कळवण बंद ठेवून कळवण बसस्थानक समोर तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोहनलाल संचेती, जयंत देवघरे, विलास शिरोडे, प्रकाश पाटील, रंगनाथ देवघरे, कुमार रायते, श्रीकांत मालपुरे, विजय बधान, देविदास विसपुते, नितीन वालखेडे, चंद्रकांत कोठावदे, लक्ष्मण खैरनार, संदीप पगार,

कैलास पगार, सागर खैरनार, सागर खैरनार, भरत अहिरे, रुपेश शिरोडे, गजानन सोनजे, हेमंत कोठावदे, शशीकांत पाटील, सुधाकर पगार, साहेबराव पगार, चंद्रकांत बुटे, विनोद मालपुरे डॉ. अनिल महाजन, प्रदीप पगार, मोहन जाधव, टिनू पगार, संतोष देशमुख आदींसह शेकडो व्यापारी व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक समाधान नागरे, उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com