पाण्यासाठी हंडा मोर्चा

पाण्यासाठी हंडा मोर्चा

नाशिकरोड। प्रतिनिधी Nashikroad

जयभवानीरोड परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा ( Low pressure water supply)होत असल्याने नवीन बांधण्यात आलेला जलकुंभ त्वरित सुरू करावा या मागणीसाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हंडा मोर्चा काढला. पाणीपुरवठा अधिकारी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

जयभवानीरोड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी वेळ होतो. दिवसातून एकदाच नळांना पाणी येते. त्यामुळे नागरिकांना दिवसभरासाठी लागणारे पाणी पुरत नाही. त्यामुळे महिलावर्गाचे हाल होत आहेत. तरी महापालिकेने जादा वेळ व जास्त दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महिलावर्गाने केली.

या मोर्चात शिवसेना उपमहानगरप्रमुख योगेश देशमुख, योगेश गाडेकर, जयंत गाडेकर, नितीन चिडे, मसूद जिलाणी, माजी महापौर नयन घोलप, योगिता गायकवाड, सरस्वती भालेराव, शोभा मगर, मंगला भास्कर, स्वाती पाटील, सुवर्णा काळोगे, शोभा घटकळ, मंजुषा कदम, विद्या दाभाडे, उज्ज्वला पाटील, सुशीला यादव, सुषमा खुळगे, रूपाली आहेर, शुभांगी सुकते, चंद्रकला पवार,

ममता सोरे, अरुणा राऊत, निर्मला गायकवाड, सुलभा वालझाडे, सरला पवार, मनीषा कवडे, रेणू ढकोलिया, मुन्नी चुडियाले, ओमबत्ती ढकोलिया, विजिता ढकोलिया, किरण गायकवाड, विकास गिते, विक्रांत थोरात, सागर निकाळजे, आकाश उगले, विजय भालेराव, नीलेश देशमुख आदी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com