ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी प्रहारचे पाळणा आंदोलन

ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी प्रहारचे पाळणा आंदोलन

बोलठाण । वार्ताहर Bolthan

जातेगांव (Jategaon) येथे एक वर्षापासून नादुरुस्त असलेले वीजेचे ट्रान्सफार्मर (Power transformer) दुरूस्त केले जात नसल्याने शेतकर्‍यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ट्रान्सफार्मर बंद असले तरी वीजबील (Electricity bill) मात्र भरावे लागत असल्याने शेतकरी (farmer) हवालदिल झाले आहेत. ट्रान्सफार्मर त्वरीत बसविण्यासाठी वीज वितरणचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या (prahar shetkari sanghatna) वतीने ट्रान्सफार्मरवरच पाळणा बांधून आंदोलन (agitation करण्यात आले. नांदगाव तालुक्यातील (nandgaon taluka) घाटमाथ्यावरील जातेगांव येथील नामदेव थोरात यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर2 सूमारे एक वर्षापासून नादुरूस्त आहे.

वीजपुरवठा बंद असला तरी शेतकर्‍यांना वीजेचे बील मात्र भरावे लागत आहे. ट्रान्सफार्मर दुरूस्त करून बसवावा यासाठी शेतकर्‍यांतर्फे पाठपुरावा सातत्याने केला जात आहे. मात्र वर्ष उलटले तरी ट्रान्सफार्मर दुरूस्तीचा (Transformer repair) मुहूर्त वीज वितरणला सापडलेला नाही. वीज वितरणच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी अक्षरश: त्रस्त झाले आहेत.

एैन रब्बी हंगामात सक्तीची वीजबील वसुली सुरू करण्यात आली असून बील न भरणार्‍या परिसरातील ट्रान्सफार्मरचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली जात आहे. यामुळे पाणी असून वीजेअभावी पिकांना देता येत नसल्याने रब्बी पिके संकटात सापडली आहे. वर्ष उलटला तरी ट्रान्सफार्मर दुरूस्ती केली जात नसल्याने या अनागोंदीची गंभीर दखल घेत प्रहार शेतकरी संघटनेतर्फे जातेगांव येथील विद्यूत रोहित्राच्या जागी पाळणा बांधून व त्यावर बसून आंदोलन सुरू केले आहे.

जोपर्यंत सदर शेतकर्‍याला तात्काळ रोहित्र उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सूरु राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार शेतकरी संघटनेचे तालूकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी केले. आंदोलनासाठी संदीप सूर्यवंशी यांच्यासह प्रहारचे उपाध्यक्ष चंद्रभान झोडगे, जनार्दन भागवत, प्रकाश चव्हाण, रविकांत भागवत, रमेश जाधव आदींसह प्रहार सेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.