वीजप्रश्नी विधानभवनावर आंदोलन

वीजप्रश्नी विधानभवनावर आंदोलन

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

नाशिक जिल्ह्यात (nashik district) मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते. जिल्ह्यात सद्यस्थितीत द्राक्षाचा हंगाम (Grape season) सुरू असून

महावितरण कंपनीच्या (MSEDCL) वतीने शेतीसाठी करण्यात येणारा वीजपुरवठा (power supply) हा अनियमित केला जात असल्याने शेतीसाठी पाणी भरताना शेतकर्‍यांना (farmers) मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सुरळीतपणे दिवसा आठ तास वीज पुरवठा (electricity supply) झाला पाहिजे. तसेच शेतातील ट्रान्सफॉर्मर (Transformer) हे जळाले तर त्यावर कंपनीच्या वतीने दुर्लक्ष केले जाते. ट्रान्सफॉर्मर जळल्यानंतर 24 तासाच्या आत बदलून मिळावा व नाशिक जिल्ह्यात (nashik district) मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतमालाचे नुकसान (crop damage) झाले असल्याने सक्तीची वीज बिल वसुली बंद करावी. तसेच नाशिक जिल्हा व निफाड तालुक्यात करण्यात येत असलेल्या इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे शेतकरी हैराण झाले आहे.

हे इमर्जन्सी लोडशेडिंग (Emergency load shedding) बंद करावे व अतिभारातील ट्रान्सफॉर्मर व अतिभारतील सबस्टेशन यांची कार्यक्षमता वाढवावी आदी विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आमदार बनकर यांनी आपल्या विधानसभेतील काही सहकार्‍यांसोबत नागपूर येथील विधानभवनाच्या पायर्‍यांवर उभे राहून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com