'या' शिक्षण संस्थेचे मयत वारस सभासदत्वासाठी आंदोलन

'या' शिक्षण संस्थेचे मयत वारस सभासदत्वासाठी आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

क्रां.वंसतराव नाईक शिक्षण संस्थेच्या (Vansatrao Naik Education Institute) सभासदांच्या जागी कुंटुबातील इतर व्यक्तीला सभासद (member) करून घेण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेर्धात सभासदांतर्फे सोमवारी (दि.14) संस्थेच्या प्रागंणात लाक्षणिक उपोषण आंदोलन (agitation) करण्यात आले.

क्रांतीवीर वंसतराव नाईक शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत सभासदांच्या (Deceased Member) जागी कुंटुबातील इतर व्यक्तीला सभासद करण्याचा ठराव झालेला आहे. या ठरावाची अंमलबजावणी होत नाही तसेच नवीन सभासद नोंदणी (New Member Registration) केली जात नसल्याच्या निषेर्धात सभासदांतर्फे हे आंदोलन (agitation) करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, सरचिटणीस हेमंत धात्रक, उपाध्यक्ष अॅड. पी. आर. गिते यांनी आंदोलकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सभासदांकडून हे आंदोलन मागे घेण्यात आले.

उपोषणास संस्थेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, प्रहार संघटनेचे दत्ता बोडके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास (agitation) सुरूवात झाली. मयत सभासदांच्या वारसांची नोंदणी करावी, यासाठी अनेकदा निवेदने (memorandum) दिली. परंतू, दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप धात्रक यांनी यावेळी केला. संस्थेच्या निवडणुकी (election) दरम्यान नवीन सभासद नोंदणी (New Member Registration) करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तीन वर्षाचा कालावधी उलटून देखील नोंदणी केली जात नसल्याचे बोडके यांनी सांगितले.

त्यानंतर अध्यक्ष थोरे व सरचिटणीस धात्रक यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माध्यमिक, व प्राथमिक शाळेसाठी, क्रीडा साहित्य, प्रयोग शाळा साहित्य,फळा खडू व काही ठिकाणी स्वच्छता गृह व्यवस्था नसणे, बेंचेसची कमतरता, या विषयावर चर्चा झाली.

आंदोलनात पांडुरंग काकड, बाबुराव भाबड, शरद बोडके, प्रमोद बोडके, परशुराम दराडे, दत्तात्रय बोडके, दिलीप धात्रक, रमेश बोडके,विजय भाबड, बडुनाना भाबड, विनायकराव शेळके, बबनराव सानप, विठ्ठलराव पालवे, रामनाथ नागरे, सुरेश कातकाडे, चंद्रकांत बोडके, गणेश घुले ,विशाल पालवे आदी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com