कामगाराच्या मृत्यू प्रकरणी रास्ता रोको

कामगाराच्या मृत्यू प्रकरणी रास्ता रोको

येवला । प्रतिनिधी Yevla

तालुक्यातील मुखेड ( Mukhed ) परिसरात विजेच्या खांबावर ( Electrical Poll ) काम करत असताना विजेचा धक्का लागून कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्या प्रकरणी ( Death of contractual worker due to electrical shock ) पोलिसांनी महावितरणच्या ( Mahavitaran ) विरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

तालुक्यातील रायते येथील रहिवासी राधु लक्ष्मण शेळके (वय 40) हे येवला तालुक्यातील मुखेड परिसरात विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असतांना अचानक त्यांना विजेचा धक्का लागला. कामगार विजेचे काम करत असतांना वीजप्रवाह बंद करण्यात आला नव्हता का? किंवा हा प्रवाह अचानक कोणाकडून व कसा सुरू झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महावितरणच्या या ढिसाळ कारभारावर परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर प्रकरणातील दोषींवर काय कठोर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महावितरण कंपनीकडून सदर कंत्राटी कामगाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी देखील परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पोलिसांनी फिर्यादीत महावितरणचा उल्लेख करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.त्यानुसार फिर्यादीमध्ये महावितरणचा उल्लेख करण्याचे आश्वासन देत नातेवाईकांची पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी समजूत काढली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com