'या'मुळे ज्येष्ठ नागरिकांनी केले धरणे आंदोलन

'या'मुळे ज्येष्ठ नागरिकांनी केले धरणे आंदोलन

मनमाड । प्रतिनिधी Manmad

पालिका प्रशासनाच्या (municipal administration) दुर्लक्षामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झालेल्या असतांना याबाबत आवाज उठविण्याच्या ऐवजी नगरसेवक (corporator), राजकीय पक्ष (political party) व संघटना मुंग गिळून गप्प बसले आहेत.

त्यामुळे या समस्याकडे आमदार (mla) आणि जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यासाठी वयोवृध्द ज्येष्ठ नागरीकांनी (senior citizens) रस्त्यावर येत संघर्ष समितीच्या (sangharsha samiti) नेतृत्वाखाली पालिके समोर धरणे आंदोलन (movement) केले.

नगरपालिकेत जे पक्ष सत्तेत आहेत त्याच पक्षांच्या काही पदाधिकार्‍यांनी जेष्ठ नागरिकांच्या आंदोलनाला पाठींबा दिला होता त्यामुळे राजकीय पक्षांचा हा दुटप्पीपणा नाही का? असा प्रश्न समस्यांनी त्रस्त नागरिकांनी उपस्थित केला असून आ. सुहास कांदे (mla suhas kande) यांनी समस्याप्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. शहरातील विविध समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी जेष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली वयोवृद्ध नागरिकांनी आज रस्त्यावर उतरत पालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे.

शहरातील समस्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने यावेळी ज्येष्ठ नागरीकांतर्फे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली. पालिका प्रशासना तर्फे सध्या शहरात 12 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा (water supply) केला जात आहे परतीच्या पावसामुळे वागदर्डी धरण पूर्ण भरून ओव्हर फ्लो झाले आहे. धरण भरल्याचे पाहून पाणी टंचाईतून (water scarcity) आपली सुटका होईल असे नागरिकांना वाटत असताना दसर्‍याला देखील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला दिवाळी देखील तीच परिस्थिती राहणार असल्याचे चित्र आहे.

शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून नागरिकांचे आरोग्य (health) धोक्यात आले आहे. मुख्य बाजारपेठेसह अनेक भागातील रस्त्यांची एका प्रकारे चाळण झालेली असून रस्त्यावर इतके खड्डे (potholes) झाले आहे कि त्यावरून पायी चालणे देखील कठीण झाले आहे.जे नवीन रस्ते तयार करण्यात आले त्या रस्त्याची अवघ्या काही महिन्यातच दुरवस्था झाली आहे.

शहरातील मुतारी, गटारीची झालेली दुरवस्था, स्मशानभूमीत निर्माण झालेल्या अनेक समस्या यासह इतर समस्यामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना त्या सोडविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागत असल्याचे ज्येष्ठ नागरीकांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष राजेंद्र पारीख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात नरेंद्र कांबळे, एस.एम.भाले, आर.बी.ढेंगळे.दिलीप आव्हाड, कृष्णाजी पगारे, रत्नाकर कांबळे. डॉ.बहादुरे, एस.बी.चौरसिया, गणपत पगारे, एस.दि.देवकर, रामभाऊ गवळी, गोपीनाथ गायकवाड, अर्जुन साळवे, राजू करोटे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून चर्चा केली आणि शहरातील समस्या 5 महिन्यात सोडवण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले. मुख्याधिकार्‍यांनी मार्चपर्यंत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आणखी पांच महिने समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. मुख्याधिकारींचे आश्वासन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्या सारखे असल्याने आ. कांदे यांनी शहरातील समस्यांकडे लक्ष घालावे अशी मागणी ज्येष्ठ नागरीकांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com