नाशिक जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे आंदोलन

नाशिक जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे आंदोलन

ओझे l प्रातिनिधी Oze

भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi)आणि उपाध्यक्ष राहूल गांधी ( Rahul Gandhi )यांच्यावर केंद्र सरकारने ईडीच्या ( ED) मदतीने सूडबुद्धीने बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे.

महागाई,( Inflation ) बेरोजगारी सारखे महत्त्वाचे प्रश्न देशात असताना या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित व्हावे यासाठी केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचे सहकार्य घेऊन काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. सामान्यांचे जगणे मुश्किल करणाऱ्या मोदी सरकारने आता प्रत्येक घटनेसाठी काँग्रेस पक्षाला जबाबदार ठरवण्याची धोरण स्वीकारले आहे.

याचा कळस म्हणजे काँग्रेस अध्यक्ष मा.सोनियाजी गांधी व मा.खा.राहुलजी गांधी यांना ED ची नोटीस पाठवुन चौकशीसाठी बोलून दडपशाही सुरू केली आहे.देशात सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढणा-या पक्षाला केंद्रीय यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचे काम मोदी सरकार करत आहे.

या सर्व घटनांच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ आणि ईडी व केंद्र सरकारच्या विरोधात नाशिक-कळवण-सुरत हायवे वर बिरसा मुंडा चौफुली येथे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष मानस पगार यांच्या नेतृत्वात असंख्य आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत मोदी सरकारचा पुतळा दहन करुन आक्रमक आंदोलन करण्यात आले यावेळी महिलांची संख्या देखील लक्षणीय होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com