आम आदमी पक्षातर्फे उद्या टोईंग विरोधात आंदोलन

शहरातील सिंग्नलवर पत्रके वाटून उपस्थित राहण्याचे नागरिकांना केले आवाहन
आम आदमी पक्षातर्फे उद्या टोईंग विरोधात आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिककरांची (Nashik) टोईंगच्या (Towing) विळख्यातून सुटका व्हावी याकरिता आम आदमी पक्षातर्फे (Aam Aadmi Party) सोमवार (दि.१२) सकाळी दहा वाजता गोल्फ क्लबच्या (Golf Club) प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात येणार आहे...

नाशिक शहरात (Nashik city) महत्वाच्या ठिकाणी पार्किंगची (Parking) व्यवस्था नसल्याने नागरिकांना रस्त्याच्या कडेला आपली वाहने पार्क करून कामासाठी अन्यत्र जावे लागते. मात्र, अशातच टोईंगची गाडी आल्यास सदरहू गाडी टोईंग कर्मचाऱ्यांकडून उचलून नेली जाते. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागते.

दरम्यान, नाशिककरांचा हा मनस्ताप थांबविण्याकरिता आम आदमी पक्षातर्फे टोईंग विरोधात आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आम आदमी पक्षाचे जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com