नाशिक l Nashik

संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमांवरती केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी तीन कायदे व प्रस्तावित वीज बिल कायदा २०२० विरोधात, तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव देणारा कायदा करण्यात यावा या व इतर मागण्यासंदर्भात आंदोलन सुरू आहे.

दि. २६ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीत लाल किल्यावर भाजप केंद्र सरकार पूरस्कृत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्याचा निषेध करण्यासाठी व दिल्लीत लढणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकार शेतकरी आंदोलनला बदनाम करत आहे याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक समोर महात्मा गांधी यांची देशद्रोही नथुराम गोडसे यांनी खून केला तो दिवस शहीद गांधींचा दिवशी देशभर १ दिवसाचे उपोषण आयोजित करण्यात आले आहे. शांततामय, अहिंसक आंदोलनाचे समर्थन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने कितीही षडयंत्र केले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन हे कायदे रद्द होई पर्यंत व हमीभाव चा कायदा होई पर्यंत संपणार नाही. तरी अधिक संघटितपणे समाजातील सर्वस्तराना सोबत घेऊन सुरुराहिल हा विश्वास व्यक्त करण्यात येईल.

एकदिवसीय ३० तारखेच्या उपोषण आंदोलन त मोठ्या संख्येने महात्मा गांधीना अभिवादन करण्यासाठी व शेतकरी आंदोलनला बळ देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा नाशिक जिल्ह्यावतीने करीत आहे.