वीज दरवाढ निर्णयाविरोधात निदर्शने

वीज दरवाढ निर्णयाविरोधात निदर्शने

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महागाईमुळे ( Inflation ) होरपळलेल्या जनतेला महाराष्ट्रात नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे - फडणवीस सरकारने विजेच्या दरांत भरमसाठ वाढ( increase in electricity rates) करून मोठा आर्थिक झटका दिला आहे.

राज्य सरकारच्या या जनविरोधी निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टी, नाशिकच्या ( Aam Aadmi party Nashik)वतीने आज बुधवार दि. 13 जुलै, २०२२ रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर शहराध्यक्ष गिरीश उगले पाटील यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.

याप्रसंगी वीजदर वाढ रद्द झालीच पाहिजे, 200 युनिट वीज मोफत मिळालीच पाहिजे, ह्या सरकारचे करायचे काय - खाली डोके वरती पाय, रद्द करा रद्द करा - वीज दरवाढ रद्द करा आदी विविध घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

याप्रसंगी प्रमोदिनी चव्हाण, योगेश कापसे, संतोष राऊत, एकनाथ सावळे, अनिल फोकणे, चंद्रशेखर महानुभाव, दिपक सरोदे, सुमित शर्मा, तुषार थेटे, साहिल सिंग, स्वप्निल घिया आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com