महागाई आणि बेरोजगारी विरोधात डाव्यांचा उद्यापासून एल्गार

महागाई आणि बेरोजगारी विरोधात डाव्यांचा उद्यापासून एल्गार

नाशिक । Nashik

जनतेची दैन्यावस्था करणार्‍या महागाई आणि बेरोजगारीविरुद्ध (Inflation and unemployment) उद्यापासून डाव्या पक्षांनी (Left parties) आंदोलन (agitation) पुकारले आहे...

३१ मे पर्यंत सुरु राहणार आहे असून हे आंदोलन महाराष्ट्रात जोरदारपणे यशस्वी करावे, अशी हाक राज्यातील डाव्या पक्षांनी दिली आहे. काल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (Marxist Communist Party) भारतीय कम्युनिस्ट पक्ष (Communist Party of India) शेतकरी कामगार पक्ष (Farmers Workers Party) लाल निशाण पक्ष (Red Flag Party) आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माले-लिबरेशन) (Communist Party of India - Male-Liberation) यांच्या राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार उद्यापासून जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवर (Collector and Tehsil offices) जनतेच्या वतीने उग्र मोर्चे आणि निदर्शने करत केंद्रातील भाजपच्या धोरणाचा (BJP policy) निषेध करावा,असे आवाहन या बैठकीते डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, डॉ. एस. के. रेगे; ’भाकप’चे तुकाराम भस्मे, प्रकाश रेड्डी, प्रा. राम बाहेती, सुभाष लांडे; ’शेकाप’ चे राजू कोरडे; लानिप’चे भीमराव बनसोड, राजेंद्र बावके आणि भाकप (माले) ’लिबरेशन’चे श्याम गोहिल व अजित पाटील यांनी केले. या आंदोलनात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जन आंदोलनांची संघर्ष समिती, इत्यादीही सहभागी होणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com